फलटण,चौफेर दि २ जुलै २०२५: ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, २०२५-२०३० या कालावधीसाठी फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मा. जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार फलटण तहसीलदार यांना सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील एकूण १३१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण गावनिहाय ठरवण्यासाठी दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता सजाई मंगल कार्यालय, विमानतळाजवळ, फलटण येथे आरक्षण सोडत प्रक्रिया होणार आहे.
तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी सर्व संबंधित अधिकारी, जनप्रतिनिधी आणि नागरिकांनी या आरक्षण सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.