फलटण चौफेर दि १२ जुलै २०२५
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास फलटण-पंढरपूर रस्त्यावर फलटण बायपास जवळ ट्रक (एमएच ११ सी ३१६०) ने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली.यामध्ये दुचाकीस्ववाराचा जागीच मृत्यू झाला दत्तात्रय बिसमल खरात (वय ५३, रा. धुणदेव, ता. फलटण)असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
फलटण पोलीसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दत्तात्रय खरात हे मोटरसायकल (क्र. एम एच ११ सीपी ३४८२) वरून फलटण पंढरपूर रस्त्यावर धुळदेव गावाच्या हद्दीत पलटण बायपास जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन खरात यांचा मृत्यू झाला.ट्रक चालक गणपत भानुदास उलगमोगले (रा. सोमकसार, ता. माण) हा पळून गेला असून चेतन खरात यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक नितीन शिंदे अधिक तपास करीत आहेत.