Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लाखो रुपयांचा तरडगाव आरोग्य केंद्रातील आरओ प्लांट धूळखात

 


फलटण चौफेर दि १२ जून २०२५

तरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने  प्राथमिक आरोग्य केंद्रात बसवण्यात आलेला आरओ प्लांट अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत धूळखात पडलेला आहे.



तरडगाव ता. फलटण येथील ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून २०२३ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तरडगाव याठिकाणी रुग्णांना शुद्ध पाणी उपलब्ध होण्यासाठी २ लाख ३९ हजार रुपये किमतीचा आरओ प्लांट बसविण्यात आला आहे. मात्र अनेक महिन्यांपासून सदर प्लांट बंद असल्याची माहिती समोर आली आहे. 



ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या मध्ये देखरेख कोणी ठेवायची या कारणावरून समन्वय नसल्याने सदर लाखो रुपयांच्या प्रकल्प धूळखात पडलेला असल्याने रुग्ण आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.


ग्रामपंचायतीने सदर प्लांट बसवून दिला आहे पुढील देखरेख ही आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी करत नसलेल्याने हा प्लांट सध्या बंद स्थितीत आहे. मात्र चर्चा करून योग्य मार्ग काढून प्लांट सुरू करण्यात येईल- दिपक सोनवणे ग्रामविकास अधिकारी


सहा महिन्यांपासून मोटरच गायब 

या आरओ प्लांट मधील एक मोटर चोरीला गेली असल्याचे देखील ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र चोरीला गेल्याची तक्रार कुठेही दाखल नसल्याची देखील माहिती मिळत आहे. तरी सहा महिन्यापासून मोटर चोरीला गेली असून तक्रार कोणी दाखल का केली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.सध्या आरोग्य केंद्रात एक स्वतंत्र फिल्टर असल्याने या आरओ रुग्णांना तसेच कर्मचाऱ्यांना पाणी ऊपलब्ध आहे. मग पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना लाखो रुपये खर्च करून आरओ प्लांट बसविण्याचा घाट कशासाठी घातला? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.