फलटण चौफेर दि १२ जून २०२५
खामगाव ता फलटण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राहुल सोनटक्के यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात गुलाल उधळून व जल्लोष करून त्यांच्या निवडीचे स्वागत केले.
या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना जगताप, माजी उपसरपंच किसन झेंडे, प्रकाश पवार, हिरामण चाबुकस्वार, सदस्य गणपत बोडरे, शकुंतला वैद्य, माधुरी जाडकर, मंजुश्री कुचेकर, ताराबाई ढगारे, मंडलाधिकारी व्ही व्ही गाडे, तलाठी मयूर शेळके, तलाठी सहाय्यक विकास भोजने, ग्रामसेवक राजाराम जाधव, डॉक्टर बाळासाहेब राऊत, युवा नेते संतोष सावळकर, ह भ प गणेश महाराज खराडे,विलास भगत सर यांची प्रमुख उपस्थिती होती.राहुल सोनटक्के यांचे विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव चे माजी आमदार दीपक चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन करत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.