फलटण चौफेर दि १२ जून १२०२५
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्या प्रशिक्षणासाठी मौजे गिरवी ता. फलटण जि. सातारा येथे दाखल झाल्या असुन गिरवी ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच व ग्रामस्थांनी या उद्यानकन्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले.
ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे २० आठवडे येथे वास्तव्यास राहणार असलेल्या या विद्यार्थीनी शेतकऱ्यांना शेतिविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेतीविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत. माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती औजारे वापर, शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदीबाबत उपस्थित गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे या उद्यान कन्यांनी सांगितले. उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविदया कार्यानुभव यांचा अभ्यास उदयानकन्या करणार आहेत. तेजस्विनी कोकाटे, तनिष्का दौंडकर,समिक्षा लावंड, श्रद्धा शिर्के,स्नेहल क्षीरसागर,संध्या सुळ या उद्यानकन्या येथे दाखल झाल्या आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहाय्यक व ग्रामस्थ यांनी यावेळी दिले.
उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.डी. पाटील , प्रा.डाॅ.जे.व्ही. लेंभे प्रा.डाॅ.ए.आर.पाटील यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभणार आहे.