Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुचाकीवरील दोघांनी महिलेच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र हिसकावले; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

 


फलटण चौफेर दि २३ जून २०२५

फलटण शहरात पुन्हा एकदा दुचाकीवरून सोनसाखळी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. दि. २१ जून  रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अनंत मंगल कार्यालय ते नरसोबानगर, कोळकी या रोडवर फिर्यादी शोभा सदानंद पाटणकर (वय ६६) या महिलेकडून दोन अनोळखी इसमांनी गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र हिसकावले.फिर्यादी शोभा पाटणकर या आपल्या नेहमीच्या मार्गावरून जात असताना, काळ्या रंगाची, नंबर प्लेट नसलेली 'शाईन' मोटारसायकल दुचाकीने दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. मोटारसायकलचा वेग कमी करताच मागील इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे मनीमंगळसूत्र हिसकावून ते घटनास्थळावरून नरसोबानगर, कोळकीच्या दिशेने पळून गेले. या संपूर्ण घटनेचा काही भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.



गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अमोल पी. रणवरे हे करत आहेत.या घटनेनंतर पोलिसांनी सतर्कतेने तपास सुरू केला असून, या गुन्ह्यातील मोटारसायकल दहिवडीच्या दिशेने गेल्याची प्राथमिक माहिती पोलीसांना मिळाली आहे. 



नुकतीच फलटण पोलिसांनी अशा प्रकारच्या दुचाकींवर कारवाई सुरू केली असून, मागील दोन दिवसांत खालील कारवाया केल्या आहेत पायी गस्त व नाकाबंदी दरम्यान मोटर वाहन कायद्यान्वये ३० प्रकरणांमध्ये एकूण १८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला, यापैकी ८ प्रकरणे नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींची होती, त्यावर ४ हजार ५०० रुपयांचा दंड झाला आहे



दि २२ पायी गस्त व नाकाबंदी दरम्यान एकूण ३६ प्रकरणांमध्ये २६ हजाररुपयांचा दंड आकारण्यात आला. यामध्ये १६ प्रकरणे नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींची १० हजार, ३फॅन्सी नंबर प्लेटच्या २० हजार आणि १७ इतर प्रकरणे १४ हजार पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, चेहऱ्यावर रुमाल बांधलेले, नंबर प्लेट नसलेले, डबल सीटवर प्रवास करणारे संशयास्पद दुचाकीस्वार आढळल्यास तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर किंवा थेट फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.तसेच, सर्व दुचाकी चालकांनी आपल्या वाहनांवर योग्य प्रकारे नंबर प्लेट लावावी, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिसांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.