फलटण, दि. 23 जून 2025 –
वीर धरणातून सध्या एकूण 6700 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असून, कालव्यांसह नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. या विसर्गामध्ये 1900 क्युसेक्स Escape, 4637 क्युसेक्स Spillway आणि कालव्यात डावा 600 क्युसेक्स व उजवा702 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. धरणाचा सध्याचा साठा 8.080 टीएमसी (85.89%) आहे. आज 469 क्युसेक्स पाण्याचा येव होत आहे.
इतर धरणांची स्थिती:
भाटघर धरण आजचा पाऊस: 7 मिमी एकूण साठा: 5.186 टीएमसी (22.07%)येव: 176 क्युसेक्स
नीरा देवघर धरण आजचा पाऊस: 17 मिमी एकूण साठा: 2.856 टीएमसी (24.35%)येव: 107 क्युसेक्स
गुंजवणी धरण आजचा पाऊस: 17 मिमी एकूण साठा: 1.644 टीएमसी (44.56%) येव: 50 क्युसेक्स
एकूण स्थिती:
चारही धरणांमधील आजचा एकूण येव: 0.802 टीएमसी एकूण साठा: 17.768 टीएमसी (36.76%) मागील वर्षी याच दिवशी: 4.966 टीएमसी (10.28%)
निरा खोऱ्यातील सर्व धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून, वीर धरणाचा विसर्ग आणि कालवा वाहिन्यांमध्ये पुरेसा जलप्रवाह सुरू आहे. भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी धरणांमध्येही सध्या पाण्याचा सतत येव असून, पुढील काळात या साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती सकारात्मक असून, सिंचनासाठी यंदा पुरेसा पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे.