Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निरा खोऱ्यात धरणांचा पाणीसाठा वाढला; वीर धरण ८७% भरले, कालव्यांमधून पाणी सोडले



फलटण चौफेर दि. २२ जून २०२५ 

मागील काही दिवसांपासून निरा खोऱ्यात जोरदार पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. विशेषतः वीर धरणात सध्या ८७.२६% पाणीसाठा असून, नीरा डावा व उजवा कालवा सुरू करण्यात आला आहे. वीर धरणात आज सकाळी ६ वाजेपर्यंत ८.२०९ टीएमसी पाणीसाठा असून, सध्या धरण ८७.२६% भरले आहे. आज धरणात ५८६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, नीरा डावा कालवा व नीरा उजवा कालव्यामधून मधून प्रत्येकी ३०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. 




भाटघर धरणात आज ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात ४.८१२ टीएमसी पाणीसाठा असून, हे धरण २०.४७% भरले आहे. धरणात ५९९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणातून पाण्याचा कोणताही विसर्ग नाही आणि पावर हाऊसही बंद आहे.





निरा देवघर धरण परिसरात आज २० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात २.७४९ टीएमसी पाणीसाठा असून, हे धरण २३.४३% भरले आहे. धरणात २२८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. येथेही सध्या पाण्याचा विसर्ग नाही आणि पावर हाऊस बंद आहे.





गुंजवणी धरणात आज सर्वाधिक २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात १.५९४ टीएमसी पाणीसाठा असून, हे धरण ४३.१९% भरले आहे. सध्या १०० क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. पाण्याचा विसर्ग अद्याप सुरू नाही. निरा खोऱ्यातील चारही प्रमुख धरणांमध्ये आज एकूण १.५१३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या चारही धरणांमध्ये मिळून १७.३६५ टीएमसी (३५.९३%) पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेस केवळ ४.८५९ टीएमसी (१०.०५%) पाणीसाठा होता. यंदा साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, पिण्याचे पाणी व शेतीसाठी पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.