फलटण चौफेर दि २३ जून २०२५
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न,फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2025 अंतर्गत ' शेतकऱ्यासाठी बँक प्रस्ताव तयार करणे' या विषयावर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक , तरडफ याठिकाणी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले . यावेळी कृषीदुत चव्हाण अविनाश ,शिंदे रोहित, शिंदे आदित्य , शिंदे समाधान, चैतन्य बोडरे , पवार रोहन व दयासागर पाटील यांनी शेतकऱ्यासोबत पीक कर्ज मिळविण्यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया समजावून घेऊन शेतकऱ्याची मदत केली . तसेच कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे, अटी व नियम समजावून सांगितल्या. कर्जाच्या परतव्याविषयी शेतकऱ्यांशी व शाखा प्रमुखाशी चर्चा केली.
यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी.चव्हाण , उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. सौ. एन.एस धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. एस. एम. साळुंखे व प्रा. सौ.एन. ए .पंडीत यांनी मार्गदर्शन केले .
या वेळी शाखाप्रमुख श्री कांतीलाल भुजबळ , पप्पू कदम , साचिन कदम , भूपेश कदम , नानासो जाधव व इत्यादी शेतकरी उपस्थित होते.