Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कृषीकन्यांकडून चौधरवाडी येथे सहभागी ग्रामीण मूल्यांकणाचे आयोजन

 


फलटण चौफेर दि २३ जून २०२५

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2025-26 अंतर्गत दिनांक 22 जून 2025 रोजी चौधरवाडी- फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संकलन फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी चौधरवाडी येथे ग्रामीण कृषी कार्य अनुभव (RAWE) कार्यक्रम, ज्याला मराठीत "प्रिपरेटरी रुरल अप्रेझल" असेही म्हणतात, हा भारतातील कृषी शिक्षणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात व्यावहारिक, प्रत्यक्ष अनुभव प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थी शेतकऱ्यांसोबत राहतात, ग्रामीण जीवनातील सामाजिक-आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक पैलूंचा अभ्यास करतात आणि स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी विस्तार उपक्रमांमध्ये भाग घेतात. 

या कार्यक्रमात ग्रामपंचायतींसाठी विकास योजना विकसित करणे देखील समाविष्ट आहे.या उपक्रमात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग लाभला असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी यामार्फत महत्वपूर्ण माहिती संकलित करण्यात आली.

त्यामध्ये गावातील भौगोलिक रचना, शेतीची पद्धत, पाणी व्यवस्थापन, सामाजिक संसाधने  आणि उपलब्ध साधनसंपत्ती यांचे नकाशे तयार करण्यात आले.

प्रस्ताविक कार्यक्रमाच्या कृषीकन्या कु.जाधव सृष्टी ,कांबळे प्रणोती, लडकत श्रेया ,कांबळे सानिका, काटकर स्नेहा, मलगुंडे प्रतीक्षा  यांनी या उपक्रमाचे आयोजन केले व कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु.डि.चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी.निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस एम साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा.निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा नितिशा पंडित यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी कृषी कन्यांचे आभार मानले व भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सहकार्याची ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.