फलटण चौफेर दि २५ जून २०२५
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण अंतर्गत ग्रा.उ. का. का. 2025-26 आयोजित येथील उदयानकन्या कु. तांबोळी बुशरा, कु. वाघ अनुराधा, कु. निकाळजे संजना, कु.कारंडे शिवांजली, कु. शिंदे साक्षी, यांनी निरगुडीमध्ये क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मा. सरपंच सौ. कोमल सस्ते, उपसरपंच मा. सौ. सारिका बनसोडे आदि उपस्थित होते. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक श्री. महादेव भिसे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धामध्ये विजय पटकविलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. व या शाळेतील शिक्षक श्री. शेखर चांगल सर यांनी खेळाचे महत्व सांगितले. व यानंतर मा. सरपंच सौ. कोमल सस्ते यांनी उद्यानकन्या व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहिर केले. या सर्व उद्यानकन्यांना उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण चे मा. प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील सर, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही. लेंभे सर , डॉ. ए.आर पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.