फलटण चौफेर दि २५ जून २०२५
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरवी येथे मंगळवार दि. २४ जून २०२५ रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.दत्तात्रय सुतार व सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमा मध्ये सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. एस. डी. निंबाळकर आणि कार्यक्रम अधिकारी मा.प्रा.डॉ. जे.व्ही.लेंभे आणि मा.प्रा.डॉ.ए.आर.पाटील व कार्यक्रम समन्वयक मा.प्रा.ए.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या तेजस्विनी कोकाटे, तनिष्का दौंडकर ,समीक्षा लावंड, श्रद्धा शिर्के, क्षीरसागर स्नेहल, सुळ संध्या यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.