तरडगाव(नवनाथ गोवेकर) – तरडगाव ता फलटण येथे मागील ४० तासांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पडत असलेल्या पावसामुळे दिवसभर वातावरणामध्ये प्रचंड उकाडा आहे वीज नसल्यामुळे पंखे बंद आहेत,घरांमध्ये अंधार, पिण्याच्या पाण्याची कमतरता, मोबाइल-इंटरनेट सेवा ठप्प अशा अडचणींनी सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून नागरिक सोशल मीडियावर प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत