Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

 



फलटण चौफेर दि २१ जानेवारी २०२५

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब, आरडीएक्सने उडवण्याची धमकी देण्याबाबत इ मेल आल्याने खळबळ उडाली आहे. आज बुधवारी काही शासकीय कार्यालयामध्ये हॉट मेल आल्यावर सातारा पोलीस हाय अलर्ट मोडवर गेले असून दुपारी एक वाजल्यापासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण खाली करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पोलिसांनी चारी बाजूला वेढा दिला असून बॉम्ब शोधक पथक स्फोटक पदार्थाचा शोध घेत आहेत.


याबाबत प्राथमिक माहिती अशी, बुधवारी हॉट मेल वर काही शासकीय कार्यालयात सातारा जिल्हाधिकारी आरडीएक्सने उडवणार असल्याचा मेल आला. सातारा पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेत कलेक्टर कार्यालयात बंदोबस्त तैनात केला. कलेक्टर ऑफीस मधील सर्वसामान्य नागरिक तसेच अधिकारी, कर्मचारी कार्यालयातून बाहेर पडले. बॉम्ब शोधक पथक आल्यानंतर त्यांची प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू झाली. याच वेळी साताऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.