फलटण चौफेर दि २४ मे २०२५
आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम अतिशय कासवगतीने सुरू असून यामधील धर्मपुरी ते लोणंद या टप्प्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असून धर्मपुरी ते पंढरपूर यामधील काम पूर्ण झाले असले तरी या मध्ये सुद्धा काही ठिकाणी काम अर्धवट असताना राजुरी ता फलटण येथील टोल नाका मात्र दि २२ पासून सुरू करण्यात आला आहे यामुळे पालखी मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाश्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भक्तीचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा हा पालखी मार्ग केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त प्रकल्प असून हा मार्ग केव्हाच पूर्ण होणे अपेक्षित होते यातील टप्पा क्रमांक २ धर्मपुरी ते लोणंद याची मुदत ही सप्टेंबर २०२३ ला संपलेली असून अजूनही या मार्गातील काम अपूर्ण आहे या मध्ये फलटण शहराला वळसा घालून जाणारा बाह्यरस्ता हा आठ किलोमीटर लांबीचा असून यामध्ये नीरा उजवा कालव्या वरील दोन पूल फलटण बारामती मार्गावरील उड्डाण पूल फलटण खुंटे मार्गावरील उड्डाणपूल तसेच बाणगंगा नदीवरील पूल व ओढ्यांवरील पूल अपूर्ण असून कामाची गती पहाता आजून एक वर्ष ही कामे पूर्ण होऊ शकत नाहीत त्याच प्रमाणे सुरवडी व तरडगाव येथील उड्डाणपूल यांचेही काम अपूर्ण असताना राजुरी टोल नाका सुरू केल्याने वैष्णव भक्तांत तीव्र नाराजी असून कामे पूर्ण होई पर्यंत टोल नाका सुरू न करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली असून काम पूर्ण होई पर्यंत टोल नाका सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी वैष्णवभक्तांनी केली आहे
० ते २० किलोमीटर साठी विशेष पास
या ठिकाणी ० ते २० किलोमीटर अंतरावरील प्रवाशांसाठी मासिक पासची सुविधा उपलब्ध असली तरी प्रवाशांना आधारकार्ड वरील पत्ता बघून विना मोबदला प्रवास करू देण्याची मागणी जोर धरू लागली आहे
सचिन ढोले पाटलांची आठवण
पालखी महामार्गाच्या काम वेळेत व गुणवत्तापूर्ण पणे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी फलटण च्या प्रांताधिकारी यांची असून या बाबत त्यांनी पालखी मार्गास भेट दिल्याचे दिसले नाही या उलट या पूर्वीचे प्रांताधिकारी सचिन ढोले सतत या कामाचा पाठपुरावा करत होते परंतू त्यांची बदली झाल्यावर कामाची स्थिती जवळजवळ जैसे थे अशीच आहे