फलटण चौफेर दि २३ मे २०२५कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करत म्हसवड पोलिसांनी १९ गोवंश जनावरांची (जर्सी गायींची) सुटका केली आहे.ही कारवाई मल्लारनगर परिसरातून म्हसवडमार्गे जाणाऱ्या चारचाकी वाहनावर करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकाने तपासणी दरम्यान वाहनात १८ जर्सी वासरं आणि एक जर्सी गाय असे एकूण १९ जनावरं मिळून आली. या जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा-पाणी देण्याची व्यवस्था नव्हती.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित दत्ता तुकाराम शिंदे (रा. सोमंथळी, ता. फलटण) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौकशी दरम्यान त्याने ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे कबूल केले.
सर्व जनावरे फलटण येथील गोपालन व गोसंवर्धन संस्थेमध्ये जमा करण्यात आली आहेत. या कारवाईत तब्बल ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे