फलटण चौफेर दि २३ मे २०२५
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नराधम बापाला फलटण न्यायालयाने १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. व्ही. चतुर यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात २०१९ साली याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
आरोपी फलटण तालुक्यातील आहे. स्वतःची मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पीडीतेच्या सख्या बापा विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सपोनि पी. पी. नागटिळक यांनी याप्रकरणी तपास केला होता. सरकारी पक्षाच्यावतीने फिरोज शेख यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. चतुर यांनी आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.