फलटण चौफेर दि १९ एप्रिल २०२५
साखरवाडी ता फलटण येथील शिवजन्मोत्सव सोहळा समिती पिंपळवाडी, साखरवाडी यांच्या वतीने रविवार दि २० एप्रिल रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य शिवजयंती निमित्त विधायक उपक्रम राबवत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर शिवतीर्थ या ठिकाणी होणार असून साखरवाडीसह पंच क्रोशीतील शिवभक्तांनी व नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला यावेळी आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे