Breaking Posts

Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आज जिल्हा दौऱ्यावर



फलटण चौफेर दि १९ एप्रिल २०२५

राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार हे आज  सातारा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी १०.३० वाजता पिंपोडे बु. (ता. कोरेगाव) येथील बाजार पटांगणावर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी भव्य शेतकरी मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. दु. १२.३० ते १.३० हा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. दुपारी २ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये रवींद्र बेडकिहाळ यांचा सत्कार समारंभ होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता स्वा. सै. शामराव पाटील फळे, फुले मार्केट कराड येथे अॅड. उदयसिंह पाटील यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते, कराड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या व विविध गावांचे सरपंच यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७.३० नंतरची वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.