फलटण चौफेर दि २० एप्रिल २०२५
साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग येथे शनिवार दि.१९ एप्रिल रोजी शैक्षणिक वर्ष २०१४/१५ च्या १०वीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला,यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला जगदाळे व पर्यवेक्षक तुळशीदास बागडे सर, ज्येष्ठ शिक्षक महादेव लांडगे,भिमकांत कुंभार, सौ मनीषा गाडेकर, सौ मंजुश्री रेवडीकर, सौ.विद्या रणवरे शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते. यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी साऊंड सिस्टीम भेट देऊ केली. विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल आपुलकी, शिक्षकांच्या बद्दलचे प्रेम व्यक्त केले. आम्ही विद्यार्थी नोकरी निमित्त कुठेही गेलो तरी शाळेबद्दल आम्हाला ओढ कायमच असते,आम्ही हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करीत असताना कधी एकदा शाळेला भेटतोय अशी आमची मानसिकता झाल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी शिक्षकांचा शाल,श्रीफळ, बुके देऊन यथोचित सत्कार केला व शिक्षकाबद्दल ॠण व्यक्त केले.अमोल निंबाळकर, ज्ञानेश्वरी माने,साहिल मुजावर,हर्षल चव्हाण,पायलकुंभार,पुष्करजगताप,सूरज घाडगे,मानली नलवडे,महामुणी,धर्माधिकारी,गौरी हाकणे,महानगर,काजल शिंदे, अमन आतार व माजी विद्यार्थी उपस्थित होते.