फलटण चौफेर दि २० एप्रिल २०२५
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे १४ वर्षांनंतर " गेट टुगेदर ( स्नेहसंमेलन) " नुकतेच उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास चौदा वर्षांपूर्वी शिकविले गुरुवर्य,विद्यार्थी, विद्यार्थीनींनी उपस्थित राहून आपल्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एस.ई.पिसाळ सर होते . चौदा वर्षांपूर्वी एकत्र शिक्षण घेत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा वर्ग भरला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करुन देताना शालेय जीवनातील गंमती जमती सांगत जून्या आठवणींत रंगले होते. यावेळी बोलताना विद्यार्थ्यांनी विद्यालयाविषयी , गुरुवर्याविषयी मनातील भावना काही अनुभव व्यक्त केले.आपल्यावर आलेल्या अडचणी वेळी शालेय वर्ग मित्रांच्या मदतीने जीवनात यशस्वीपणे बाहेर पडलो लग्न झाले मुलं झाली पती - पत्नी यशस्वी वाटचाल करीत आहे अशी भावना काहीना व्यक्त केली.कार्यक्रमच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांप्रमाणे नियमित ऑर्डर देऊन राष्ट्रगीत, प्रार्थना झाले सुरवातीला मुल्य शिक्षण झाले. प्रारंभी सरस्वतीच्या फोटोचे पूजन व दिपप्रज्वलन गुरुवर्याच्या हस्ते झाले. चौदा वर्षांपूर्वी शिकविलेले गुरुवर्य एन.एस. निंबाळकर यांचे निधन झाले त्यांना प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.उपस्थित गुरुवर्याना शाल, श्रीफळ,फेटा, झाडं देऊन गौरविण्यात आले, विद्यार्थ्यांची ओळख आंब्याचे झाड देऊन करण्यात आली .गेट टुगेदर आयोजित करण्यासाठी. सुमित जगताप, डॉ प्रियांका धुमाळ,अक्षय गावडे,शेखर देवकुळे अक्षय धुमाळ, अक्षय गावडे रोहित नामदास यांनी परिश्रम घेतले. विद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कृतज्ञतेच्या भावनेतून विद्यालयासाठी " ग्रंथालयासाठी कपाट" भेट देण्यात आले.विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री.सस्ते यांच्या कडे सुपुर्त करण्यात आले. यावेळी चौदा वर्षांपूर्वीचे माजी मुख्याध्यापक एस.ई.पिसाळ सर सह एच .टी.निबाळकर सर,खापे सर,शेख सर, घाडगे सर, गायकवाड सर, विकास घोरपडे सर, बळीप सर,डी.एन. भिवरकर सर , किरण पवार सर कदम सर,प्राचार्य सस्ते सर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी दत्ता चौधरी, राजेंद्र भागवत, प्रवीण निंबाळकर, रुपाली जाधव जाधव मॅडम उपस्थित होते. सुमित जगताप उपस्थित गुरुवर्याचे स्वागत केले निखिल कापले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.पर्यावरण विषयी जागृती राहुल गावडे यांनी मार्गदर्शन केले.