साखरवाडी : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेप्रमाणे वैशाख शुद्ध द्वितीयेला फलटण शहराबरोबर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दरम्यान, शिवजयंती निमित्त साखरवाडी येथे आज भव्य मिरवणूकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे शिवजयंती निमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर अशा विधायक कार्यक्रमाबरोबर पारंपारिक वाद्य व डीजेच्या तालात तोरणा गडावरून आणलेल्या शिव ज्योतीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे सायंकाळी साखरवाडी ग्रामपंचयात कार्यालयाच्या पटांगणात असणाऱ्या शिवस्मारकाची आरती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे