फलटण चौफेर दि ११ एप्रिल २०२५
वडजल ता फलटण ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्रीकांत बापू सुळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी श्री चव्हाण साहेब, तलाठी अधिकारी मोरे साहेब वडजल चे ग्रामसेवक श्री हिम्मतराव गायकवाड साहेब यांनी काम पाहिले उपसरपंच श्रीकांत सुळ यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सरपंच सौ स्वाती अमोल पिसाळ, माजी सरपंच सौ रेशमा दत्तात्रेय ढेंबरे, सरपंच सौ संगीता वामन ढेंबरे, माजी उपसरपंच श्री योगेश तानाजी ढेंबरे, श्री विकास हनुमंत पिसाळ,सौ छाया दादा पिसाळ ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ मंडळ वडजल आणि संपूर्ण राजे गटातील पदाधिकारी विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे निंबाळकर, श्रीमंत रघुनाथ राजेनाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता बापू अनपट व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले