नाथ संप्रदायाचे मुख्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
असे म्हटले जाते, आदीदैवत शिवशंकर मानले जाते.नाथ संप्रदायाचा प्रत्यक्ष कार्यारंभ मच्छिंद्रनाथांपासून सुरू झाला. नाथ संप्रदायाची जन्मभूमी उत्तर भारत असावी, असा ग्रह सर्वत्र रूड आहे. नाथपंथ म्हणजे वारकरी संप्रदाय मानला जातो, वारकरी संप्रदाय हा विष्णूंचा म्हणजेच पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचा, उपासना प्रधान पंथ हा सांप्रदाय योग प्रधान असल्याने, तसेच योग मार्गाने 'अवधूत' अवस्था प्राप्त करणे, हे त्यांचे ध्येय असल्याने, या संप्रदायाला 'योग संप्रदाय किंवा अवधूत संप्रदाय' अशी ही नावे लाभली आहेत.संतश्रेष्ठ ज्ञानदेव महाराज हे नाथ संप्रदायातीलच, त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील शुद्ध मनाचे, अधिष्ठान लाभल्याशिवाय योग साधनेचा प्रारंभ होऊ शकत नाही अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, दया, मित्त आहार, संतोष, दान, ईश्वर पूजा, लज्जा होम, यांच्या सहयोगी अभ्यासातून साधलेली समाधी ही सुद्धा एक मनाची अवस्था आहे.
नाथ संप्रदाय हा गुरू मार्ग आहे आदिनाथ गुरु गोरक्षनाथांनी गुरुविना राहू नकोस, असा इशारा दिला या तत्त्वाचे आणि गुरु गौरवाचे उत्तम उदाहरण संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या रचनेतून केलेला आहे.
नाथ संप्रदाय महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातही मिसळला गेला म्हणजेच दोघांमध्ये समन्वय झाला अर्थातच निवृत्तीनाथांनी या संप्रदायाला वारकरी (भागवत )संप्रदायात आणले आणि नंतर निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान देव नामदेव चोखोबा अशी ही एक परंपरा निर्माण झाली.नाथ संप्रदायामध्ये योग मार्गाला खूप महत्त्व असल्याने धन्य ज्ञानदेव योग साधुनिया भक्ती अवरोया दावी लोकाअशाप्रकारे ज्ञानदेव महाराजांनी योगा सर्वात सुलभ साधना मार्ग असल्याचे आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले.नित्य हरी कथा नाम संकीर्तन संतांचे दर्शन सर्वकाळ पंढरीची वारी आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुखरूपनाथ संप्रदायाचे थोरी, प्रकट केली ज्ञानेश्वरी
नाथ परंपरेचा वारसा निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वरांना प्राप्त झाला सहज योगाचा वारसा पुढे चालू ठेवताना ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरण आणि भक्ती मार्गावर भर दिला.साखरवाडी/ पिंपळवाडी
येथील "योगीराज गुणानाथ महाराज", हे नाथ संप्रदायातील
नाथ संप्रदायामध्ये गुरुला खूप महत्व असते याप्रमाणे योगीराज गुणानाथ महाराजांनी, त्रिपुटी ता. कोरेगाव, जि. सातारा परमपूज्य, परब्रम्ह, गोपाळनाथ महाराजांच्या कडून दीक्षा घेतली, इच्छित कार्य पूर्ण झाल्यानंतर योगीराज गुणानाथ महाराजांनी, योग मार्गाने संजीवन समाधी घेतली संजीवन समाधीला चालू वर्षी २०५ वर्ष पूर्ण होत आहेत. संजीवन समाधी सोहळा चैत्र वैद्य ३, बुधवार दि. १६ एप्रिल २०२५ रोजी आहे, निमित्त श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, व अखंड हरिनाम सप्ताह, यांचे आयोजन असून नित्य कीर्तन, प्रवचनाचा, लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहेमंदिरातील वर्षभरातील सर्व खर्च हा सढळ हाताने दिलेल्या भाविकांच्या देणगीतूनच व भिक्षा रुपी दिलेल्या धान्य विक्रीतून होतो.
नाथ संप्रदायामध्ये भिक्षा, अन्नदान, देण्याला खूप महत्त्व आहे, गुणानाथ महाराज त्याकाळी रोजच्या रोज गावात फिरून भिक्षा मागूनच त्यांचा चरितार्थ चालत असे.
समाधी सोहळ्यानिमित्त भिक्षा मागण्याचे काम चालू असून आपल्या दारी आलेल्या भिक्षेकरेला मोकळ्या हाताने न लावता आपल्या इच्छेनुसार धान्य, आर्थिक मदत, देऊन सहकार्य करावे.श्री. अखंड ज्ञानेश्वर पारायण संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरामध्ये नित्य महाआरती, भजन कीर्तन, प्रवचन, अन्नदान, चालू असते.ज्ञानेश्वरी पारायण काळात भाविक अत्यंत सढळ हाताने अन्नदान करीत असतात.दि.१६/४/२०२५ संजीवन समाधी सोहळ्याला बहुसंख्य भाविक उपस्थित होते ह.भ.प. फरांदे महाराज (निंबूत) यांचे सुंदर असे काल्याचे किर्तन होऊन नियमाप्रमाणे दहीहंडी फोडण्याचा मान दानशूर वै. धोंडीबा मुकिंदा पवार यांचे कुटुंबीयांना असुन सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलीप धोंडीबा पवार व पवार कुटुंबीयांनी विणा लावून दहीहंडी फोडली पवार कुटुंबातील साध्वी अबई पवार या गुणानाथ महाराजांच्या शिष्य होत्या, त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्यांनी त्याकाळी घोड्यावरून भिक्षा मागण्याचे काम केले, त्यातूनच भंडारा घातला जात असत, आजही ती परंपरा कायम तसीच चालू असून यावर्षी महाप्रसाद माईसाहेब यांच्या प्रेरणेने व दानशूर वैकुंठवाशी धोंडीबा मुकिंदा पवार यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे पुत्र श्री दिलीप धोंडीबा पवार उर्फ बाबा यांनी अत्यंत सढळ हाताने महाप्रसाद अन्नदान केले, पारायण काळात सकाळचा काकडा श्री रुक्मिणी प्रसादिक महिला भजनी मंडळ पिंपळवाडी यांनी केला तसेच रोजच्या कीर्तन, भजन, प्रवचनाचा व महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी सर्वांनी घेतला. दर महिन्याला पौर्णिमा उत्सवही ते तितक्याच उत्साहाने साजरा करतात.गुरुकृपेतूनच साधना मार्ग
योगीराज श्री गुणानाथ महाराज हे समाधीस्थ झाले पण ते चैतन्य रूपात, सगुण रूपात सदा सर्वकाळ आहेतच, जे भाविक मनापासून त्यांची भक्ती करतात त्यांना ते दर्शन देतात, त्यांच्या पाठीशी ते सदा सर्वकाळ उभे राहतात, फक्त हे कार्य त्यांनी केले हा भाव मनाशी पाहिजे.
जय जय राम कृष्ण हरी
श्री रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण. जि. सातारा फो. ९९७०७४९१७७