फलटण चौफेर दि २३ एप्रिल २०२५
फलटण लोणंद रस्त्यावर फलटण शहरातील एका पेट्रोल पंपाच्या समोर एक चार चाकी गाडी भरधाव वेगाने खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात एक जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी,दि.२३ रोजी पहाटे ५.३०वाजण्याच्या सुमारास फिर्यादी लक्ष्मी कदम रा झरे ता आटपाडी जि सांगली सध्या रा शास्त्रीनगर, मेन रोड धारावी मुंबई या पती किशोर परशुराम कदम,मुलगा रियांश,पुतणी प्रणाली या व्हॅगनर चारचाकी क्र (एम एच ०१ डी एक्स ८४३८) मधून मुंबईहून सांगलीच्या दिशेने जात असताना चालक मनोज वसंत शिवडीकर रा शास्त्रीनगर धारावी यांनी सदरची गाडी भरधाव वेगात चालवून त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील वळणावर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्ये गाडी आपटून अपघात होऊन मुलगा रियांश, पुतणी प्रणाली यांच्या किरकोळ व गंभीर दुखापतीस व पती किशोर परशुराम कदम यांच्या मृत्यूस व स्वत:च्या गंभीर दुखापतीस चालक मनोज शिवडीकर कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे