फलटण चौफेर दि २४ मार्च २०२५
पाच सर्कल, खामगाव ता फलटण येथे बुधवार दि २६ रोजी श्री. विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदीर जिर्णोद्धार सोहळा,मुर्तीप्रतिष्ठापणा व कलशारोहन सोहळ्याचे थानापती महंत देवेद्र पुरीजी महाराज, श्री. पंचदशनाम जुना आखाडा गिरणार, गुजरात श्रीमहंत उमेशानंद पुरीजी महाराज, श्री. पंचदशनाम जुना आखाडा गिरणार, गुजरात (महाराष्ट्र मंडल, श्रीमहंत) यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले आहे याकाळात साजऱ्या होणाऱ्या विविध कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे
मंगळवार दि. २५रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत श्रीच्या मुर्तीचे व कलशची ग्राम प्रदक्षिणा सवाद्य मिरवणूक सायंकाळी ९ वा.श्री.ह.भ.प. डॉ. निलेश महाराज नलवडे, खामगांव बुधवार दि.२६ रोजी पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत सकाळी ९ ते १० वा.पुण्याह वाचन सकाळी १० ते १ वा.मुर्ती स्थापना व कलशारोहन, पुर्ण आहुती दुपारी १ ते २ वा.ध्वज पुजन, कुन्ड पुजन व अग्नी स्थापना दुपारी ३ ते ८ वा.एकादशी फराळ सायंकाळी ९ ते ११ वा.श्री.ह.भ.प.विश्वास आप्पा कोळेकर गुरुवार २७ सकाळी ९ ते ११ वा.किर्तन - किर्तन - ह.भ.प. नवनाथ महाराज माने (पणदरे, बारामती) दुपारी १ ते आगमनापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ व थोरात परिवार, श्री. स्वयंभु दत्त सेवा संस्था,श्री. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान दिंडी, शिवरत्न ग्रुप, ५ सर्कल, नवरात्र शारदोत्सव मंडळ, स्वामी समर्थ सांप्रदायीक भजनी मंडळ साखरवाडी, स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ ५ सर्कल,आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक मंडळ, माऊलीकृपा भजनी मंडळ पिंपळवाडी, पंचक्रोशी भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे