फलटण चौफेर दि २४ मार्च २०२५
एक नव्हे दोन नव्हे तब्बल ४३ वर्षांनी जिंती ता फलटण येथील श्री जितोबा विद्यालय च्या १९८२/८३वर्षाच्या दहावीतील विद्यार्थ्यांचा वर्ग पुन्हा एकदा भरला आणि जुन्या आठवणींना सर्वांनीच उजाळा दिला श्री जितोबा विद्यालय जिंती येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक २३ रोजी पार पडलाया स्नेह मेळाव्याचा मुख्य उद्देश हा ४३ वर्षांनी गुरु व शिष्यांच्या संवाद व शाळेच्या अडीअडचणी समजावून शाळेला सहकार्य करणे वर्ग मित्रांचा परिवार यांच्यामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याकरता विचार विनिमय करण्याचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सांगितले स्नेह मेळाव्याला शिंदे व्ही.बी. विज्ञान शिक्षक,साबळे डी .बी. गणित शिक्षक, बबनराव काळोखे (मामा) व धुमाळ साहेब कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाची संकल्पना संभाजी ढेंबरे ,भरत रणवरे,विश्वास भोसले, रामभाऊ रणवरे दत्तात्रय शिंदे ,राजकुमार रणवरे हे स्थानिक कमिटीने योग्य नियोजन करून सकाळी ९ वाजता सनई चौघड्याच्या तालात गुरु शिष्यांची मिरवणूक करण्यात आली सूत्रसंचालन प्रभाकर काटे यांनी केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जाधव मॅडम व त्यांची सर्व शिक्षक सहकारी उपस्थित होते आभार विश्वास भोसले यांनी मानले