फलटण चौफेर दि २२ मार्च २०२५
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-९६५DD (विभाग-१) वरील शिरवळ-लोणंद विभागाच्या पेव्ह्ड शोल्डरसहित २-लेन/४-लेन मध्ये अपग्रेडेशनसाठी आणि राष्ट्रीय महामार्ग-९६५D वरील लोणंद-सातारा विभागाच्या पेव्ह्ड शोल्डरसहित २-लेन मध्ये अपग्रेडेशनसाठी ६११.८४ कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली असून सदर प्रकल्प रस्ता (राष्ट्रीय महामार्ग-९६५D आणि राष्ट्रीय महामार्ग-९६५DD) हा पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४८), पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६५), पालखी महामार्ग (एनएच-९६५) आणि निर्माणाधीन सुरत-चेन्नई द्रुतगती मार्गासह प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा फीडर आहे.सातारा, फलटण, लोणंद आणि शिरवळच्या आजूबाजूच्या परिसरात झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिक वाढ यामुळे या मार्गावरील वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. हा प्रकल्प सातारा-लोणंद (एनएच-९६५D) आणि शिरवळ-लोणंद (एनएच-९६५DD) या विभागांतील जड वाहनांच्या वाहतुकीमुळे आणि प्रदेशातील वाढत्या रिबन आणि औद्योगिक विकासामुळे मार्ग अद्ययावत करण्याची मागणी पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये व्यक्त केला आहे