फलटण चौफेर दि २० मार्च २०२५
धोम बलकवडी कालव्याचे पाणी विंचुर्णी ता फलटण गावाच्या हद्दीतील पंदरकी तलावात न सोडल्यास पुनर्वसन जोरगांव, विंचुर्णी, कुरवली खुर्द, या गावातील शेतकऱ्यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा उपविभागीय अधिकारी प्रियांका अंबेकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे की, रब्बी हंगाम २०२५ च्या पाळीचे पाणी लाभ क्षेत्रात बसत नसणा-या इतर गावांना दिले आहे.मात्र विचुर्णी गांव हे लाभ क्षेत्रात असून देखील जाणीव पूर्वक विचुर्णी गावातील पंदरकी तलावात पाणी सोडले नाही व चालू असणारे पाणी बंद केले आहे पाणी एकच दिवस आले नंतर बंद केले आहे. गाव वंचित ठेवण्यात आलेले आहे. तरी दिनांक २१ पर्यंत विंचूर्णी गावाचे पंदरकी तलावात पाणी न सोडल्यास विंचुर्णी गावचे व वर नमूद गावचे ग्रामस्थ हे आत्मदहन करणार आहेत. कारण तलावातील पाण्यावर अवलंबून अंदाजे ८४६ हेक्टर क्षेत्र आहे. विंचुर्णी गावातील पंदरकीचा तलावात पाणी सोडले नाही तर गावातील लोकवस्ती व ३ गावचे लाभ क्षेत्र या पाण्यावर अवजंबून आहे. ज्यांचे जमीन क्षेत्र हे धोमबलकवडी कालव्यासाठी संपादनात गेलेले आहे. त्यांचे पुनर्वसन गाव याच पाटाचे पंदरकी तलावाचे लाभ धारक आहेत. लोकवस्तीला व जनावरांसाठी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून ऊभी पिके जळून चालली आहेत जनावरांना पिण्याचे पाणी व चारा कोठून आणवयाचे असे अनेक प्रश्न आहेत. आता तर कुठे उन्हाळा सुरु झाला आहे तोच अशी परिस्थिती झाली आहे. तरी आपण लवकरात लवकर पाणी सोडावे.धोम बलकवडी कालाव्याचा काही अडचणीमुळे किंवा काही घटनामुळे पाणी सोडणे बंद केले होते व त्यानंतर आमची पाणी पाळीची वेळ संपत आली आहे. तरी आमचे हक्काचे पाणी आम्हांला मिळावे अन्यथा आम्ही सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे