Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अलोट गर्दीत श्रीमंत रामराजेंचा वाढदिवस साजरा तालुक्यातील विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम

 


फलटण चौफेर दि ३१ मार्च २०२५

           विधान परिषदेचे माजी सभापती विद्यमान आमदार फलटण तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस गुढीपाडव्या दिवशी फलटण येथील लक्ष्मी विलास या त्यांच्या निवासस्थानी अत्यंत हजारो अबाल वृद्धांच्या गर्दीत उत्साहात साजरा झाला यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील गावा गावामधून असंख्य कार्यकर्त्यांनी  गर्दी केली होती   सकाळी नऊ वाजता श्रीमंत रामराजे यांचे औक्षण त्यांच्या भगिनी श्रीमंत शुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी केले यानंतर त्यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या शामियाण्यामध्ये त्यांनी शुभेच्छा स्विकारायला सुरुवात केली त्यांच्या सोबत फलटण संस्थानचे युवराज व रामराजे यांचे पुत्र श्रीमंत अनिकेतराजे ना निंबाळकर उपस्थित होते श्रीमंत रामराजे यांच्यावर प्रेम करणारे गेली तीस पस्तीस वर्षे निष्ठेने श्रीमंत रामराजे यांना साथ देणारे त्यांचे कार्यकर्ते यांनी रांगेत येऊन शिस्तीने त्यांना शुभेच्छा दिल्या  यावर्षी श्रीमंत रामराजे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहाने विविध स्पर्धा, लोकोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा  करण्यात आल्याचे फलटण कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले   वाढदिवसानिमित्त शहरासह गावोगावी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, फळे वाटप ,चित्रकला, वक्तृत्व ,रांगोळी, गायन स्पर्धा त्याचबरोबर समाज उपयोगी अनेक कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी केले होते . वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यानी व नागरिकांनी सहभाग घेतला     यावेळी श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर , श्रीमंत रघुनाथराजे ना निंबाळकर , अनिकेतराजे ना निंबाळकर , फलटण कोरेगाव विधान सभेचे माजी आमदार दीपक चव्हाण , श्रीराम जवाहर कारखान्याचे चेअरमन डॉ बाळासाहेब शेंडे विविध गावातील सरपंच उपसरपंच ,सदस्य सोसायटीचे चेअरमन व सदस्य उपस्थित होते  दिवसभर विविध ठिकाणी श्रीमंत रामराजे यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.