Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यातील डी पी चोऱ्या रोखण्यासाठी ग्रामस्थ व महावितरणचे सहकार्य आवश्यक- पो नि सुनील महाडिक

 


फलटण चौफेर दि १९ मार्च २०२५

फलटण तालुक्यात होत असलेल्या डी पी चोऱ्या रोखण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी  पोलीस प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक असून या माध्यमातून आपण तालुक्यात होत असणाऱ्या डीपी चोऱ्या रोखू शकतो असे प्रतिपादन फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी  तालुक्यात होत असलेल्या डीपी चोरी संदर्भात आयोजित  कांबळेश्वर, वडजल, वाठार निंबाळकर, निंभोरे, सुरवडी व फडतरवाडी या गावतील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील यांच्या आयोजित संयुक्तिक बैठकीवेळी केले 

पो नि सुनील महाडिक पुढे म्हणाले,रात्री अपरात्री  डीपी ट्रिप होऊन  परत चालू झाला नाही ही बाब सब स्टेशनला समजते त्यांनी जर ही बाब ग्रामसुरक्षा यंत्रणा हेल्प लाइन वरून कॉल केला तर ही बाब ग्राम सुरक्षा यंत्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना कळवून संबंधित डीपी चोरटा पकडला जाऊ शकतो मागील एक महिन्यांपासून फलटण ग्रामीण पोलीस अशा आशयाची कारवाई करत आहेत त्यामुळे तालुक्यामध्ये मागील महिन्यात डीपी चोरांच्या घटनांमध्ये घट झाली आहे

परंतु काही गावे ही यंत्रणा राबविण्यास निरुत्साही आहेत म्हणजे त्याना सुरक्षा हा विषय कमी महत्वाचा वाटतो म्हणून त्यांच्या समुपदेशनसाठी ही बैठक बोलावली होती मात्र डीपी चोरीच्या सर्वाधिक घटना घडणाऱ्या  भिलकटी, वडजल, सूरवडी गावांमधील ग्रामपंचायत प्रशासन या बैठकीस उपस्थित नव्हते ही खेदाची बाब आहे.महावितरण सुद्धा डीपी चोरीवरती उपाय योजने साठी संवेदनशील दिसून येत नसून ग्रामसुरक्षा यंत्रणेचे गोरडे यांचेशी त्यांचे संपर्क करून सब स्टेशन चे ऑपरेटर चा नंबर या यंत्रणेत घेणे बाबत पाठपुरावा केला होता त्यप्रमाणे त्यांनी नंबर घेतले होते परंतु पुढे त्यांची समन्वय  न ठेवल्याने ते  नंबर ग्रामसुरक्षा यंत्रणेने काढून टाकले आहेत या बैठकीत तो विषय सुद्धा समन्वय ग्रामसुरक्षा यंत्रणा महावितरण व गावकरी यांच्यासाठी उपलब्ध होण्याचा प्रयत्न केला  तसेच पोलीस यंत्रणा कमी असलेने व दुर्गम भागातील डीपी पोलिसांना रात्री उशिरा टॉपोग्राफी व डीपी लोकेशन माहीत नसलेने सापडत नाही या साठी महावितरण व ग्रामस्त यांचे सहकार्य लाभले तर नक्की डीपी चोरी थांबेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.