फलटण चौफेर दि १९ मार्च २०२५
विंचुर्णी ता फलटण येथील जोतिबा मंदिर पाटील वस्ती हद्दीतील ट्रान्सफार्मर एकाच महिन्यात तीन वेळा जळाल्याची घटना घडली आहे त्यामुळे या ट्रान्सफर्मर वरती अवलंबून असणाऱ्या शेती व घरगुती वीज कनेक्शन बंद असल्याने या ठिकाणच्या शेती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे येथील रहिवाशांनी तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे तात्काळ या ठिकाणी सदोष ट्रान्सफार्मर बसवण्यात यावा अशी मागणी केली आहे त्यानुसार या ठिकाणचा ट्रान्सफार्मर सुरुवातीला दि २७ फेब्रुवारी रोजी बंद पडला या नंतर या ठिकाणी २ मार्च ला ट्रान्सफार्मर बसवण्यात आला मात्र तो दुसऱ्याच दिवशी जळला त्यानंतर तिसऱ्यांदा १३ मार्च रोजी या ठिकाणी ट्रान्सफार्मर बसवण्यात आला मात्र तोही बसवल्यानंतर थोड्याच वेळात जळाल्याचे या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेतकरी अधिकाऱ्यांकडे गेले असता ते उडवा उडवीची उत्तर देतायत आणि डी पी बसवण्यासाठी टाळाटाळ करत आहेत अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे पिके जळून खाक व्हायला लागली आहेत या ठिकाणी मोठी लोकवस्ती असल्याने पशूपालकांचे मोठेमोठाले गोठे असून जनावरांच्या पाण्यासाठी मोठी कसरत ग्रामस्थांना करायला लागत आहे तरी या महावितरण ने तात्काळ या ठिकाणी ट्रान्सफार्मर बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे