Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुखाचा मूलमंत्र शुभविवाह!



लग्न हा निव्वळ भावनांचा, प्रश्न नसून आयुष्यभराची एक जबाबदारी असते, तरुणांना आपला प्रपंच, आपल्या एकट्याच्या खांद्यावर तोलण्याची जबाबदारी पार पाडावी लागते,आजचा समाज, जुन्या, आणि नव्या, पिढीच्या मध्यावर आहे, जुन्या विचारांची माणसे, प्रपंचाकडे, त्यांच्या विचाराने पाहतात, आणि नुकताच बदल होऊ घातलेली पिढी, आपल्या विचाराने प्रपंच करू इच्छिते, त्यामुळे प्रत्येक कुटुंबात, सध्यातरी नव्या, जुन्या, विचारांच्या संघर्षाच्या ठिणगी उडत आहेत, जुनी माणसं आपल्या विचारांना चिकटून आहेत, नवीन पिढीला जगातल्या वाढत्या बदलाची, भुरळ पडली आहे, दोन्हींच्या समन्वयात सर्वच माणसे संभ्रमावस्थेत जगत आहेत ज्या दोघांचा विवाह होतो, त्यातले पती-पत्नी एका विचाराचे असतील तर त्यांच्या प्रपंचात कशाची अडचण येत नाही, कारण मुलाकडचे लोक जुन्या विचाराचे असतील, आणि मुलीकडचे लोक आधुनिक विचाराचे असतील तर मुला मुलींवर त्यांच्या घरातल्या लोकांचे संस्कार होतात, एकमेकांच्या विचारात फारकत होते. तडजोड महत्वाची ठरते.

मुला, मुलींनी केवळ दिसण्यावर न जाता, त्यांचे स्वभाव, आचार विचार, वागणे, शिक्षण, या गोष्टी पारखुन घ्यायला हव्यात लग्न या वारंवार घडणाऱ्या गोष्टी नाहीत, एक लग्न मोडले तर, दुसरं लग्न मनासारखं करता येत नाही, आयुष्यात लग्नही एकदाच मना सारखं करता, येण्यासारखी गोष्ट असते, ती एकदा फसली म्हणजे, आयुष्यातला रस कायमचा निघून जातो, मग आयुष्यात केवळ तडजोडी शिवाय पर्याय उरत नाही* म्हणूनच प्रत्येक तरुण-तरुणीने हा निर्णय खूपच विचारपूर्वक घ्यायला हवा ! त्यात उतावळेपणा, कोणाच्या आग्रहाला बळी पडणे, हुंड्याची लालसा, या गोष्टी विचारपूर्वक दूर ठेवल्या पाहिजेत, अन्यथा आयुष्याचे मातेरे करून घ्यायला, आपण स्वतः जबाबदार ठरतो. समाजात स्वतःचा मोठेपणा मिळवण्यासाठी, अनेक नातलग, मित्र, तुमच्या मागे लागतील, एक एक नवनवीन स्थळ दाखवतील, परंतु तुम्ही त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिका. ज्या आई-वडिलांना आपला अधिकार आपल्या मुलांपेक्षा मोठा वाटतो, त्यांनी आयुष्यात निदान येथे तरी, आपले अधिकार गुंडाळून ठेवून, मुलांच्या मनाचा देखील विचार करावा.

 निव्वळ आपल्या धनदौलतीचा, नातेगोतेचा तोरा, जरा बाजूला ठेवून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार प्राधान्य द्यावे, अन्यथा तुम्हालाच पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. स्नेहीजणांच्या भावनांपेक्षा, आपल्या मुलांच्या भावनांना, अधिक महत्त्व देऊन तो निर्णय सर्वस्वी मुलांचा आहे, असा उघड पवित्रा पालकांनी घ्यायला हवा!म्हणजे स्नेहीजनांचा गैरसमज होणार नाही. आणि मुलांची इच्छानांही धक्का पोहोचणार नाही.

वधू वरांनी, जेव्हा बोहल्यावर चढण्याची तयारी केलेली असते, एकमेकांचा परिचय करून घ्यावा, आचार विचार, राहण्याची पद्धत, शिस्त, चारित्र्य, मित्र-मैत्रिणी, आवड निवड इत्यादी लहान सहान गुणांची माहिती करून घ्यावी. कारण प्रपंच टिकायला आणि मोडायला हेच कारणं कारणीभूत ठरत असतात.जीवन जगताना, कुटुंबात वरील सर्व गोष्टींना विशेष महत्त्व निश्चितच आहे. मुलं-मुली निव्वळ दिसायला सुंदर असून उपयोग नाही, तर गुणांचीही सुंदरता तितकीच महत्त्वाची.लग्नानंतर तडजोड करत बसण्यापेक्षा, लग्ना अगोदर तडजोड करून योग्य त्याची निवड करणे निश्चित शहाणपणाचे ठरू शकते.लग्नानंतर गाठ बांधलेल्या वधूला आयुष्यभर सुखी ठेवण्याची जबाबदारी तिच्या पतीचे असते. त्यांच्याशिवाय दुसरं कोणी तिची जबाबदारी घेणार नसतं, तिचे आई वडील, भाऊ, बहीण, देखील एकदा तिला सासरी पाठवल्यानंतर तिची जबाबदारी झटकून मोकळे होतात. जीवन हा एक विचित्र खेळ आहे, सख्खे देखील नावापुरते, कुणाला तरी सांभाळतात, आणि वेळ आली की जबाबदारी झटकून मोकळे होतात, स्त्रियांच्या बाबतीत हा दुर्दैवी प्रसंग अनेकदा येतो.

पतीने आपल्या पत्नीचा योग्य आदर केला, तरच तिचा जग आणि मुलंही आदर करतात. म्हणून पतीने आपल्या पत्नीला नेहमीच योग्य मानसन्मान देऊन तिच्या भरण पोषणाचे जबाबदारी आपल्या शरीरावर घेतली पाहिजे, माणूस हा कधीच परिपूर्ण असू शकत नाही, त्यामुळे आपल्या पत्नीत जर कसलेही दोष असतील तर ते तिच्या नजरेस आणून देऊन, तिला सुधारण्याची संधी पतीने अवश्य दिली पाहिजे. अनेकदा लग्न होईपर्यंत स्त्री पुरुष एकमेकांना अनेक आश्वासन देतात, परंतु लग्नानंतर ते सारे आश्वासन खोटे ठरतात, दोघांचाही अहंकार जागा होतो.घराला घरपण येतं ते त्या घरातल्या स्त्रीमुळे, घरातले सर्वाधिक अधिकार स्त्रीच्या हातात असतात, घरात प्रसन्नता ठेवणे, शिस्त, स्वच्छता, इत्यादीमुळे मनुष्याला घरात प्रसन्न वाटते, पत्नी म्हणून जी स्त्री आपल्या पतीच्या घरात प्रवेश करते, तेव्हा तिला सर्व गोष्टींचा ज्ञान असणे आवश्यक आहे, आधुनिक जगाच्या बदलत्या संकल्पनाच्या नादात, आता मुलींना स्वयंपाक करण्यापासून, टापटीपीत राहण्यापासून, स्वच्छता पासून शिस्त पूजाअर्चा संस्कारां पासून वेगळे ठेवले जाते, करिअर बरोबर याही गोष्टी खूप आवश्यक आहेत.संसार सुखाचा करण्यासाठी पती-पत्नी दोघांच्या एक विचाराची खूप गरज असते

श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण. जि. सातारा फोन ९९७०७४९१७७

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.