Breaking Posts

Type Here to Get Search Results !

अहिल्यानगर फुटबॉल क्लबने पटकावला इलेव्हन स्टार फुटबॉल चषक

 


फलटण चौफेर दि १२ फेब्रुवारी २०२५

साखरवाडी ता फलटण येथील  इलेव्हन स्टार फुटबॉल चषक आयोजीत राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धां २०२५ चा प्रथम क्रमांकासह चषक अहिल्यानगर फुटबॉल क्लब अहिल्यानगर या संघाने पटकावला या संघाने रूपाली फुटबॉल क्लब पुणे यांचा पेंनल्टी शूट आऊट मध्ये ३ -२ ने पराभव केला रुपाली फुटबॉल क्लब या संघाचा व्दितीय क्रमांक आला साखरवाडी गावामध्ये  सलग चाळीस वर्षाहून अधिक काळापासून या स्पर्धांचे आयोजन केले जाते या वर्षी दि ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान श्री दत्त इंडिया कारखान्याच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते राज्यभरातील २० हुन अधिक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता अतिशय अतितटीचा झालेल्या अंतिम सामना बरोबरीत सुटल्याने सामन्याचा निकाल पेंनल्टी शूट आऊट द्वारे करण्यात आला यामध्ये अहिल्यानगरचा संघ विजयी ठरला विजयी संघाला श्रीदत्त इंडिया कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांच्या हस्ते रोख रक्कम रुपये ५० हजार व चषक देण्यात आला द्वितीय क्रमांक ३० हजार व चषक रुपाली पुणे संघ, तृतीय क्रमांक १५ हजार व चषक  पुणे पोलीस सिटी  तर चतुर्थ क्रमांक ७ हजार रु व चषक  नोयजी बॉयज पुणे  या संघाला मिळाला यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती, शंकरराव माडकर,डी के पवार माजी संचालक महानंदा ,मातोश्री कंट्रक्शनचे संजय भोसले,  श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले,सतीश माने,समीर भोसले,राजेंद्र भोसले, के के भोसले, एस के भोसले,नितीन भोसले,अभंयसिंह नाईक निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय वाघ, हरीश गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते या स्पर्धा पार पाडण्यासाठी इलेव्हन स्टार फुटबॉल क्लबचे डॉ विक्रम खानविलकर,डॉ आनंद जाधव,दीपक पंडित, शरद भोसले, आप्पा गायकवाड, नितीन कुचेकर, प्रवीण काटकर, विनोद कुचेकर, संजय बनकर, संजय जाडकर, सुभाष बोंद्रे सर, नितीन बोंद्रे, विकी भोसले, सचिन धोत्रे, जॉन गायकवाड, सचिन गलियल,  राजेंद्र शेंडगे, सुनील वाघ, धनंजय जावळे, आशिष् शहा, रुपेश खानविलकर, सागर वाघ, पिंटू माडकर, हिमकेत ढेंबरे, निलेश धायगुडे, निलेश धोत्रे, सौरभ भगत, प्रभाकर पवार, रविद्र इंगळे, तानाजी पवार, संजय वाबळे, उत्तम जाधव, अमोल भोसलकर, सुनील भोसले, निसार आतार, महेश खरात, काशीनाथ नगराळे, रोहन गायकवाड, राहुल बोंद्रे, समीर बोंद्रे, संदीप खोमणे यांनी कष्ट घेतले सर्व सामन्यांचे समालोचन शिवव्याख्याते अमोल खेसे यांनी केले


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.