Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून ३६३१ लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचा लाभ -जयकुमार शिंदे

 


फलटण चौफेर दि २१ फेब्रुवारी२०२५

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान आवास योजनेच्या (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत २० ल लाभार्थीना घरकुलाचे मंजुरी पत्र व १० लाख लाभार्थीना पहिला हप्ता वितरणाचा शुभारंभ कार्यक्रम उद्या दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अध्यक्षतेखाली व , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बालेवाडी  येथे हा भव्य कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे.  या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन या राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे करणार आहेत. फलटण तालुक्यातील ३६३१ सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल योजना देण्याच्या संदर्भामध्ये मा.खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर ,आमदार सचिन पाटील यांनी  प्रयत्न करून या तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या तालुक्यातील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना ही भविष्यात घरकुल सरकार देणार आहे. यासाठी मा.खासदार व आमदार सचिन पाटील प्रयत्न करीत आहेत. हा ऐतिहासिक सोहळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये व ग्रामपंचायत स्तरावर  करण्याचा  निर्णय सरकार ने घेतलेला आहे. त्यामुळे हा सोहळ्यात स्थानिक महायुतीचे पदाधिकारी नी आपल्या आपल्या गावात सहभागी व्हावे.तसेच पात्र लाभार्थी चा सन्मान करावा असे आवाहन भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केले आहे .हा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी या राज्यातील हा सर्वात मोठा पायलेट प्रोजेक्ट म्हणून याकडे ल केंद्रित केले आहे. जेणेकरून एक ही व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही. हे सरकार सर्व सामान्य जनतेचे काम करणारे सरकार आहे. शेतकरी , महिला ,युवक व्यापारी तसेच समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन राज्याचा विकास करून हे राज्य देशातील आदर्श राज्य निर्माण करायचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.