Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इयत्ता १० वी शालांत परीक्षेची मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील बैठक व्यवस्था

 



फलटण चौफेर दि २१ फेब्रुवारी २०२५

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर  विभागातर्फे आजपासून सुरू झालेल्या केलेल्या एस .एस. सी. बोर्ड परीक्षा मार्च २०२५ची मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण केंद्र क्रमांक १००३ येथे परीक्षा होणार असून परीक्षा क्रमांक  F0 25558 ते  F0 25955 ( एकूण ३९८ विद्यार्थी )या क्रमांकाची बैठक व्यवस्था  या केंद्रावर करण्यात आलेली आहे याची सर्व विद्यार्थी व पालकांनी  नोंद घ्यावी .विद्यार्थ्यांनी वरील केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेले अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे  रिसीट ,ओळखपत्र, लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी ३० मिनिट अगोदर उपस्थित राहावे , उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमणध्वनी ,टॅबलेट ,इलेक्ट्रॉनिक घड्याळ (स्मार्ट वॉच), पॉकेट, कॅल्क्युलेटर,   इलेक्ट्रॉनिक साधने तसेच बोर्डाने बंदी घातलेली साधने परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारच्या गैर मार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त व निर्भय वातावरणात परीक्षा द्यावी तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आव्हान केंद्र संचालक श्री .कदम मनोज अशोकराव, उपकेंद्र संचालक श्री. पाटील विजयकुमार हरिभाऊ ,श्री. नलावडे राकेश बापूराव ,श्री. घोरपडे उत्तम जगन्नाथ, प्राचार्य श्री . वेदपाठक संजय रामकृष्ण ,   उपप्राचार्य श्री. काळे बाळकृष्ण दादा यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.