Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सासकल येथे कृषि विभाग मार्फत ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन व फुले सुपरकेन ऊस प्लॉट प्रक्षेत्र भेट संपन्न

 


  फलटण  चौफेर दि १३ फेब्रुवारी २०२५

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आज दिनांक १३  रोजी वाघजाई मंदिर सासकल  येथे ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन व सुपर केन नर्सरी या विषयावरती मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते  यावेळी गोरख मुळीक यांच्या शेतावर ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन आयोजन केले होते 

यावेळी ऊस विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव मा  डॉ राजेंद्र भिलारे यांनी ऊसाची पाचट न जाळता खोडवा नियोजन करून ऊस तुटून घेल्यावर उसाचे वर तोडलेले बुडके कोयत्याने छाटून त्यावरती बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करण्याबाबत तसेच पाचट कुजण्यासाठी १० किलो जिवाणू चा वापर एकरी ५० किलो नत्र, स्फुरद ५० किलो, वरील प्रमाणे खत मात्र 15 दिवसाच्या ऊस तुटल्यानं द्यावा जेणेकरून पाचट खुजण्यासाठी मदत होईल खोडवा पिकासाठी खताचे नियोजन करताना हेक्टरी २५० किलो नत्र ११५ किलो, स्फूरद व ११५ किलो पालाश द्यावे त्यापैकी ऊस तुटल्या नंतर १५ दिवसाच्या आत मध्ये ५० टक्के खत मात्रा द्यावी उरलेले खत मात्र ऊस तुटल्या नंतर १२० दिवसांनी द्यावी तसेच खत देताना पहारी च्या माध्यमातून मुळाच्या सानिध्यात द्यावी असे मार्गदर्शन तसेच पाचट शेतामध्ये कुजवून सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे आवाहन यावेळी डॉ राजेंद्र भिलारे यांनी केले 

यावेळी ऊस बेणे विक्री अधिकारी, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव डॉ दत्तात्रय थोरवे यांनी उसाच्या विविध नवीन विकसित ऊस जात फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७ आणि फुले ऊस १५००७ या ऊस उसाच्या जाती विषयी माहिती दिली तसेच विद्यापीठाने शिफ़ारस केलेल्या फुले सुपरकेन  नर्सरी ऊस रोपे निर्मिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये ऊस रोपे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

तसेच तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांनी  फलटण तालुक्यात एकूण ६८० फुले सुपर केन नर्सरी द्वारे ऊसाची लागवड केले असल्याचे  त्यापैकी सासकल गावातील १८ शेतकऱ्यानी सुपर केन नर्सरी द्वारे ऊसाची लागवड केले असल्याचे तसेच ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन तालुक्यात ६० टक्के क्षेत्रावरती असल्याचे सांगितले 

श्री मच्छिन्द्र मुळीक यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शन खाली फुले सुपर केन नर्सरी द्वारे रोपे तयार करून  ७ फूट पट्टा पद्धतीने लागवड केलेल्या ऊस प्लॉट उत्कृष्ट नियोजन असल्याचे एकरी १०० टना पर्यंत लक्ष शक्य होणार असल्याचे  ऊस  प्लॉट पहाणी प्रसंगी ऊस विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र डॉ राजेंद्र भिलारे यांनी सांगितले 

यावेळी मंडळ कृषि अधिकारी विडणी  शहाजी शिंदे, कृषि पर्यवेक्षक विडणी अशोक जगदाळे, महाराष्ट्र शासन कृषी सेवा रत्न पुरस्कार प्राप्त सचिन जाधव तसेच प्रगतशील ऊस बागायतदार सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा येथील शेतकरी उपस्थित होते

सूत्रसंचालन व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषी सेवा रत्न पुरस्कार प्राप्त सचिन जाधव यांनी केले होते यावेळी प्रगतशील ऊस बागायतदार मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.