Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते १० बसचे लोकार्पण

 


फलटण चौफेर  दि. १४ फेब्रुवारी २०२५

राज्य परिवहन विभागाकडून फलटण आगारास प्राप्त झालेल्या १० नवीन अत्याधुनिक एस.टी. बसेसचे उद्घाटन व लोकार्पण  माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व फलटण कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांनी परिवहन विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे फलटण आगारास पहिल्या टप्यात या १० नवीन बस मिळाल्या असून उर्वरित बस लवकरच फलटण आगारामध्ये दाखल होणार असल्याचे रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड,  सुरक्षा अधिकारी गायकवाड, फलटण आगार प्रभारी व्यवस्थापक राहुल वाघमोडे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक शुभम रणवरे, प्रभारी स्थानक प्रमुख सुहास कोरडे, वाहतूक निरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव आहिवळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धिरज अहिवळे यांच्यासह बहुसंख्य चालक वाहक कर्मचारी, प्रवाशी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.