फलटण चौफेर दि १७ फेब्रुवारी २०२५
माजीं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे सरकारी कामात अडथळा आणण्याचा हा प्रकार २०१४ मध्ये घडला होता त्यामुळे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे