फलटण चौफेर दि १८ फेब्रुवारी २०२५
होळ ता फलटण गावाच्या हद्दीत खालचा मळा नामक शिवारातील १५ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, होळ गावातून वाहणाऱ्या नीरा नदीच्या पात्रामध्ये होळ,पिंपळवाडी,७ सर्कल भागातील शेतकऱ्यांचे ५, ७.५ व १० एच पी क्षमतेचे कृषी पंप आहेत पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी कृषीपंपा पासून २०० ते ३०० फूट लांब शेतकऱ्यांचे स्टार्टर चे बॉक्स आहेत त्यामुळे कृषी पंपाला २०० ते ३०० फूट लांब दोन ते तीन हजार रुपये किंमतीच्या तांबे धातूच्या वायर आहेत काल दि १७ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या नदीपात्रालगतच्या १५ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वायर कट करून चोरून नेल्या आहेत सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील आडसाली सुरू ऊस,मका,गहू,हरभरा पिकांना पाणी देण्याची लगबग सुरू आहे अशातच चोरट्यांनी वायर चोरून नेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बुर्दंड बसला आहे याआधी या भागातून अनेकदा ट्रान्सफॉर्मर व कृषी पंप चोरीच्या घटना घडल्या आहेत ट्रान्सफार्मर व कृषी पंपानंतर चोरट्यांनी वायर चोरण्याकडे आपला मोर्चा वळवल्याने शेतकऱ्यांपुढे आता नवीनच संकट उभे राहिले आहे