Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गावठी कट्टा बाळगनारा रेकॉडवरील सराईत जेरबंद

  


फलटण चौफेर दि १३ फेब्रुवारी २०२५

फलटण ग्रामीण पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला असून संशयित अजय कल्लु बेनकर रा बावीस फाटा गणेशशेरी धुळदेव ता फलटण जि सातारा हा मौजे विडणी ता. फलटण  असे त्याचे नाव आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी दि १२ रोजी  पोलीस निरीक्षक महाडीकसो यांना गोपनिय माहीती मिळाली की, अजय कल्लु बेनकर रा बावीस फाटा गणेशशेरी धुळदेव ता फलटण जि सातारा हा मौजे विडणी ता. फलटण गावचे हद्दीत फलटण ते पंढरपूर रोडवर बस स्टॉपजवळ उभा आहे. आणि त्याचेकडे गावठी बनावटीचे फायर आर्म बाळगुन वावरत आहे व तो विक्री करण्याचा पर्यत्न करीत आहे. अशी खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाल्यानंतर त्यावेळी लागलीच  पोलीस निरीक्षक महाडीक साो यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक  जी बी बदने, पो हवा नितीन चतुरे, पो हवा वैभव सुर्यवंशी, पो ना अमोल जगदाळे, पो ना श्रीनाथ कदम, पो कों हणुमंत दडस, पो कॉ शिवराज जाधव यानां सदर ठिकाणी जावुन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पोलीस पथक रवाना झाले. सदर ठिकाणी गेल्यावर एक इसम संशयीतरीत्या वावरताना आढळुन आला. त्याला पोलीसाची चाहुल लागल्याने तो पळुन जाण्याच्या पर्यत्नात असताना पो ना श्रीनाथ कदमे यांनी झडप मारुन पकडुन ताब्यात घेतले असता त्याच्या कंबरेला गावठी बनावटीचा कट्टा व त्याच्या खिशातील एक जिवंत काडतुस व एक रिकामी पुंगळी मिळुन आली. सदर अग्नी शस्त्रामधुन एक एक गोळी फायर करण्याची बनावट दिसुन आली. सदर इसमाला याबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे भंगार काम करणारा परप्रांतीय कामगाराकडुन घेतलेली आहे असे त्याने सांगितले. सदर अग्नीशस्त्र पोलीसांनी जप्त करुन त्याचे विरुध्द फलटण ग्रामीण पोलीस  गुन्हा दाखल केला आहे. 



.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.