Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यात सापडला पहिला जीबीएस रुग्ण आमदार सचिन पाटलांनी घेतली कुटुंबियांची भेट

 


फलटण चौफेर दि १३ फेब्रुवारी २०२५

फलटण तालुक्यातील आसू या गावामध्ये  विराज सतीश पवार वय १३ वर्षीय मुलाला जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे याबाबतची माहिती मिळताच आमदार सचिन पाटील यांनी  कुटुंबियांची भेट घेवून  त्यांना आधार दिला. तसेच आसू गावातील पशुवैधकीय केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गावातील गटार, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था, स्वच्छता तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कामाची पाहणी केली. यावेळी  ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी व पशुवैद्याधिकारी यांचेकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले  याची गंभीर दखल घेऊन त्यांना कामात कुचराई करू नये व नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा असा सज्जड इशारा दिला  नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निरसन करण्यासंबंधी सूचना देऊन हा  आजार पसरू नये याबाबत काळजी घेण्याचेही आवाहन केले यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुंभार साहेब, तालुका आरोग्य अधिकारी दिघे साहेब, भाजप तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, युवा नेते विशाल माने, युवा नेते अमोल लवळे आसू गावचे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.