Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मलवडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

 




फलटण चौफेर दि १९ फेब्रुवारी २०२५

फलटण ग्रामीण पोलिसांनी मलवडी तालुका फलटण येथे सुरू असलेल्या तीन पाणी ना मग जुगार अड्ड्यावर छापा टाकून १ लाख ८६ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे संशयित रज्जाक हिराभाई सय्यद, वय ५० वर्ष,  तात्याबा सखाराम सुळ वय ३३ वर्ष, निलेश बापू टकले, वय २८ वर्ष,  विजय बळीबा तरडे, वय ३२ वर्ष, संजय यशवंत टकले पाच ही जण रा.मलवडी, ता. फलटण व  सतिश सायबू चव्हाण वय ३५ वर्ष,  वडगाव ता फलटण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत  याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणकातून मिळालेली अधिक माहिती अशी दिनांक १९ रोजी रात्री रोजी १.३० वाजण्याच्या मलवडी गावाच्या हद्दीत  रज्जाक हिराभाई सय्यद यांचे घराचे आडोश्याला उघडयावर मोकळे जागेत लाईटच्या उजेडात संशयित बेकायदा, बिगरपरवाना पत्त्याचे पानावर पैजेवर पैसे लावुन तिन पानी पत्त्याचा जुगार स्वतःचे आर्थीक फायदया करीता खेळत असताना त्यांचे कब्जात १ लाख ८६ हजार ६३० रुपयाचे किंमतीचा जुगाराचा मुद्देमाल मिळून आला 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.