Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुणे पंढरपूर पालखी मार्गावर ऊसाची ट्रॉली उलटली

 



फलटण चौफेर दि १८ फेब्रुवारी २०२५

             पुणे पंढरपूर महामार्गावर  तांबमाळ येथे ऊस वाहतूक करणारी ट्रॉली महामार्गावरच पलटी झाल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेत अडथळा निर्माण झाला होता ही वाहतूक धीम्या गतीने  सुरू ठेवली होती वाहतूक एकेरी मार्गाने सुरू असल्याने संथ गतीने वाहतूक सुरू होती पालखी महामार्गावरील काम दिरंगाईने सुरू असून ट्रॉली पलटी झाल्याने कामात अडथळा निर्माण झाला होता  फलटणहुन पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी ऊसाची ट्रॉली पलटी झाली होती त्यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरू असली तरी ती संथ गतीने सुरू होती  ऊसतोडणी मजुरांनी पलटी झालेल्या उसाच्या ट्रॉलीतील ऊस दुसऱ्या ट्रॉलीत भरला त्यामुळे काही काळात निर्माण झालेला अडथळा दूर झाल्यावर   मार्गिका पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली 

            फलटणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्याने ताण आला होता त्यातच महामार्गाचे काम सुरू असल्याने ठीक ठिकाणी अडथळे निर्माण होत होते ऊस वाहतूक करणारी वाहने क्षमते पेक्षा जास्त ऊस भरल्या मुळे ही वाहने पलटी होत आहेत उसाच्या ट्रॉली पलटी होण्याच्या घटना वारंवार घडत असून क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने चाक निसटल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.