फलटण चौफेर दि १९ फेब्रुवारी २०२५
टाकळवाडे ता फलटण गावाच्या हद्दीत जमिनीच्या वादातून दोन गटात कोयत्याने मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत दोघांनीही एकमेकांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार,
अजित दादासो मिंड हे शेतात पीव्हीसी पाईप जोडत असताना कैलास दादासो मिंडने यांनी पाईप तोडल्याचे पाहून अजितने यांनी कैलास यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. या वादातून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष झाला. कैलास दादासो मिंड यांनी अजित दादासो मिंड यांना लोखंडी कोयत्याने मारहाण केली, तर विलास मिंड, नर्मदा दादासो मिंड, व मनिषा विलास मिंडने अजित दादासो मिंड व पत्नी रुपालीला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर दुसऱ्या फिर्यादीत कैलास दादासो मिंड यांच्या घरासमोर अजित दादासो मिंड यांनी आमच्या विरोधात रस्ता मागणीसाठी तहसीलदार कार्यालयात तक्रार का दिली? या कारणावरून कैलास दादासो मिंड व भाऊ विलास यांना कोयत्याने व आई नर्मदा यांना हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण केली असल्याचे म्हटले आहे या घटनेत दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. जखमी व्यक्तींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे.