फलटण चौफेर दि ३० नोव्हेंबर २०२४ : विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर सत्ता स्थापनेवर गेल्या आठ दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज महायुतीचा सत्तावाटपाचा पेच जवळपास सुटल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आता महायुती सरकारचा ५ डिसेंबर रोजी ५ वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. या शपथविधीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे