फलटण चौफेर दि २ डिसेंबर २०२४ - फलटण ता रावडी बु. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषि दुतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक मुरघास तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले. या कार्यक्रमात कृषि दुतांनी फुलोरा अवस्थेतील मका वापरून उच्च दर्जाचे मुरघास कसे तयार करता येते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकादरम्यान मुरघास तयार करण्याची प्रक्रिया, लागणारी साधने व पद्धती आणि मुरघास तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे पशुपालनात मोठा फायदा होऊ शकतो, याबाबत माहिती दिली. मुरघास तयार केल्याने पशुधनाला पौष्टिक आहार मिळतो व दूध उत्पादनात वाढ होते. या प्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि प्रश्न विचारून अधिक माहिती मिळवली.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यू.डी.चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नीतीशा पंडित मॅडम व प्रा. लाळगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओमकार, सार्थक शेंडगे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.