Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रावडी बु. येथे 'फळ बागेसाठी खतांचा वापर' यावर कृषिदूतांचे प्रात्यक्षिक

 


फलटण चौफेर दि ३० नोव्हेंबर २०२४

   महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी चे कृषी महाविद्यालय फलटण येथील  कृषिदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४/२५ कार्यक्रमा अंतर्गत  रावडी बु. येथे फळ बागेसाठी आवश्यक असणारे खते व त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दिले.गावचे ग्रामस्थ अक्षय अनिल संकपाळ यांच्या केळी फळ बागेत हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिका साठी 'रिंग पद्धत 'वापरण्यात आली, साधारणतः फळ झाडापासून १ फुट अंतरावर वर्तुळ आकारात ८ सेमी उंची चे कुदळ च्या मदतीने खोदकाम करण्यात आले, पिकामध्ये आवश्यक घटकांची कमी असल्यांमुळे, पानांचा रंग पिवळा होणे, अपेक्षित असलेले वाढ न होणे, अश्या अनेक समस्या होत्या, त्या लक्षात घेता  कृषी दुतांनी पिकासाठी आवश्यक असणारे N:P:K या खतांचा वापर केला. प्रति झाडास १२० ग्रॅम युरिया, २०० ग्रॅम SSP व १२०ग्रॅम MOP अश्या खतांचा वापर करण्यात आला. यावेळी गावचे शेतकरी राहुल संकपाळ, दादासो निकम, हनुमंत गायकवाड, विकास जगदाळे, विकास शिंदे, सुहास भोसले, विजयकुमार बोंद्रे, इ. शेतकरी उपस्थित होते. 

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक - प्रा. निलिमा धालपे मॅडम व प्रोफेसर शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओमकार, सार्थक शेंडगे  यांनी प्रात्यक्षिक पार पाडले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.