फलटण चौफेर दि १०
शालांत परीक्षा पास होऊन मार्च १९९६ मध्ये बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेहमेळावा साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय साखरवाडी माध्यमिक विभागामध्ये पार पडला. तब्बल २८ वर्षानंतर एकत्रित आलेले मित्र व मैत्रिणींना आज त्याच शाळेतील त्याच बाकावर एकत्रित बसून मागील जुन्या आठवणींना उजाळा देताना प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा नकळत पाणावल्या.
सन१९९१ ते १९९६ या कालावधीमध्ये पाचवी ते दहावीमध्ये शिक्षण घेऊन दहावी नंतर बाहेर पडलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी मागील काळामध्ये प्रत्येकजण राजकीय, शैक्षणिक ,व्यावसायिक,सामाजिक क्षेत्रामध्ये तर कोणी नोकरी मध्ये रममाण झाला होता. आताच्या सोशल मीडियाच्या माध्यमांमुळे आपण एकत्रित येऊन स्नेहमेळावा आयोजित करू असे काही माजी विद्यार्थ्यांनी ठरवले व आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना तसे निरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून धाडले. त्यानुसार तारीख व वेळ ठरवण्यात आली ठरलेल्या तारखेच्या दिवशी सर्वांनी शाळेमध्ये एकत्र येऊन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊन शाळेच्या प्रारंगणात आठवण म्हणून वृक्षारोपण केले व संपूर्ण दिवस शाळेच्या आवारात सवंगड्यांसोबत घालवला
यावेळी शाळेचे आजी माजी शिक्षक व शिक्षिका उपस्थित यामध्ये माजी मुख्याध्यापक पी एन बोन्द्रे सर,कोंढाळकर सर,चोपडे सर,खंडझोडे सर,जयराम भोसले सर,गायकवाड सर,कोळी सर,इंगळे मॅडम,करे मॅडम,बोडरे सर,सगरे सर उपस्थित होते