प्रतिनिधी शिवाजी भोसले
फलटण तालुक्यातील डीपी चोरीच सत्र सुरूच असून चोरट्यांनी दि १०रोजी रात्रीच्या सुमारास खराडेवाडी ता फलटण गावाच्या हद्दीतील रेल्वेलाईन नामक ६३ केव्ही क्षमतेचा ट्रान्सफार्मर फोडून त्यामधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याची घटना घडली आहे फलटण तालुक्यात मागील काही दिवसापासून ट्रान्सफॉर्मर चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत आठच दिवसांपूर्वी सुरवडी गावातील २०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफार्मर चोरीला गेला असून परत एकदा काल खराडेवाडी गावातील ट्रान्सफार्मर चोरी गेल्याने शेतकऱ्यांवर पिकांना पाणी देण्यासाठी आता नवीन संकट ओढवले आहे पोलिसांनी ट्रान्सफार्मर चोरट्यांच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे